शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसान योजनेच्या 22 व्या हप्त्याचे ₹2,000 कधी येणार? मोठी अपडेट आली समोर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana: देशभरातील कोट्यवधी शेतकरी सध्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २२व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेतीसाठी वाढणारा खर्च, बियाणे, खतं, डिझेलचे दर आणि घरखर्च यामुळे शेतकऱ्यांसाठी पीएम किसानचे ₹२००० हे मोठे आधारवड ठरतात. नोव्हेंबर महिन्यात २१वा हप्ता जमा झाल्यानंतर आता पुढचा हप्ता कधी येणार, याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण ₹६००० दिले जातात. हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच दर चार महिन्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. मात्र, मागील हप्ता उशिरा आल्याने यावेळीही शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशातच २२व्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे.

२२व्या हप्त्याची घोषणा कधी होऊ शकते?

मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा पुढील म्हणजेच २२वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी संसदेत सादर होणार आहे. या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पीएम किसान योजनेबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काही दिवसांत पीएम किसानचा २२वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. म्हणजेच बजेटआधी पैसे येण्याची शक्यता कमी असून, बजेटनंतर थेट खात्यात ₹२००० जमा होऊ शकतात. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तारीख सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

पैसे येणार की नाही? असा चेक करा तुमचा पीएम किसान स्टेटस

अनेक वेळा ई-केवायसी, आधार लिंकिंग किंवा बँक खात्यातील चुकांमुळे शेतकऱ्यांचे हप्ते अडकतात. त्यामुळे तुम्हाला २२वा हप्ता मिळणार की नाही, हे आधीच तपासणे खूप महत्त्वाचे आहे.

  • स्टेटस तपासण्यासाठी सर्वात आधी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • होमपेजवर दिलेल्या Farmers Corner या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर Beneficiary Status किंवा Status या पर्यायावर क्लिक करा.
  • इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि सिक्युरिटी कोड टाका.
  • यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल.
  • OTP टाकल्यानंतर तुमचा पीएम किसान स्टेटस स्क्रीनवर दिसेल.

जर स्टेटसमध्ये “Payment Pending” किंवा “e-KYC not done” असे दिसत असेल, तर तात्काळ आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करा. अन्यथा हप्ता येण्यास विलंब होऊ शकतो. PM Kisan Yojana

पीएम किसान योजना ही आजही देशातील छोट्या व मध्यम शेतकऱ्यांसाठी मोठा आधार आहे. शेती संकटात असताना हे ₹२००० अनेक घरांसाठी दिलासा ठरतात. त्यामुळे सरकारकडून लवकरच २२व्या हप्त्याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपली माहिती अपडेट ठेवावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत घोषणा होताच आम्ही सर्वात आधी अपडेट देऊ. त्यामुळे ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!