शेतकऱ्यांनो लक्ष द्या! फेब्रुवारीत 6 हजार रुपयांबाबत होणार मोठा निर्णय; 22 व्या हप्त्यासाठी आली महत्त्वाची अपडेट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan 22nd Installment Update: शेतकरी बांधवांनो, सध्या सगळीकडे एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार? नोव्हेंबर महिन्यात २१ वा हप्ता जमा झाला आणि तेव्हापासून शेतकरी पुढच्या पैशांची वाट पाहत आहेत. जर तुम्हीही या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. PM Kisan 22nd Installment Update

​फेब्रुवारीत मिळणार गूड न्यूज?

​पीएम किसान योजनेचे नियम पाहता, दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा होतात. वर्षाला एकूण ६ हजार रुपये मिळतात. आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे. १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री बजेट सादर करतील आणि याच दिवशी २२ व्या हप्त्याबाबत मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

​जाणकारांच्या मते, बजेट सादर झाल्याशिवाय किंवा त्या दरम्यानच या हप्त्याची तारीख निश्चित होईल. त्यामुळे फेब्रुवारी महिना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो.

​एका कुटुंबात किती जणांना लाभ मिळतो?

​अनेकदा शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम असतो की घरातील किती जण या योजनेचा लाभ घेऊ शकतात? नियम अगदी स्पष्ट आहे – एका रेशन कार्डवर फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळतो. जर पती आणि पत्नी दोघांनीही अर्ज केला असेल, तरीही लाभ एकालाच मिळतो. जर चुकीच्या पद्धतीने दोघांनी पैसे उचलले, तर सरकार ते पैसे परत वसूल करू शकते.

​तुमचे पैसे येणार की नाही? असे तपासा स्टेटस

​तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही, हे पाहण्यासाठी तुम्हाला कोणाकडेही जाण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः मोबाईलवर हे चेक करू शकता:

​१. सर्वात आधी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.

२. तिथे ‘Farmers Corner’ मध्ये जाऊन ‘Know Your Status’ वर क्लिक करा.

३. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड टाका.

४. तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या हप्त्याची संपूर्ण माहिती दिसेल.

Leave a Comment

error: Content is protected !!