HDFC च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! ‘ही’ 1 चूक अन् काही मिनिटांत अकाऊंट होऊ शकते पूर्ण खाली

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HDFC Bank News: आजच्या डिजिटल युगात बँकिंग सोपं झालं असलं, तरी धोका तितकाच वाढलेला आहे. विशेषतः मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सायबर फसवणूक ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. अशातच देशातील आघाडीची खासगी बँक असलेल्या HDFC बँकेने जानेवारी २०२६ मध्ये आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक गंभीर इशारा जारी केला आहे. एका छोट्याशा चुकीमुळे, एका क्लिकमुळे तुमच्या आयुष्याची सगळी कमाई काही मिनिटांत लुटली जाऊ शकते, असा धक्कादायक इशारा बँकेकडून देण्यात आला आहे.

नेमकं काय आहे हा धोकादायक APK फ्रॉड?

सायबर चोरटे आता अगदी नियोजनबद्ध पद्धतीने सामान्य नागरिकांना जाळ्यात ओढत आहेत. बँक अधिकारी, इन्कम टॅक्स विभाग, आरटीओ किंवा सरकारी खात्यांच्या नावाने तुमच्या मोबाईलवर मेसेज येतो. ‘तुमचं KYC अपडेट करा’, ‘तुमचं बँक खाते ब्लॉक होणार आहे’, ‘ई-चलान बाकी आहे’ अशा शब्दांत भीती निर्माण केली जाते. घाबरलेला ग्राहक मेसेजमधील लिंकवर क्लिक करतो आणि इथूनच फसवणुकीची खरी सुरुवात होते.

एक क्लिक आणि फोन हॅकरच्या ताब्यात

त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये एक APK फाईल डाउनलोड होते. दिसायला साधं वाटणारं हे ॲप प्रत्यक्षात अत्यंत धोकादायक असतं. एकदा ते इंस्टॉल झालं की हॅकरला तुमच्या मोबाईलचा पूर्ण रिमोट ॲक्सेस मिळतो. तुमचे SMS, कॉन्टॅक्ट्स, फोटो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँकेकडून येणारे OTP थेट हॅकर वाचू शकतो. ग्राहकाला कळायच्या आत खात्यातून पैसे काढले जातात आणि काही मिनिटांत संपूर्ण अकाऊंट रिकामं केलं जातं.

आजवरचा सर्वांत मोठा डिजिटल धोका?

HDFC बँकेच्या मते, हा APK फ्रॉड इतका प्रगत आहे की अनेक सुशिक्षित, अनुभवी ग्राहकही त्याला बळी पडले आहेत. विशेष म्हणजे व्यवहार सुरू असताना ग्राहकाच्या फोनवर OTP येतो, पण तो आधीच हॅकरकडे जात असल्याने ग्राहक काहीच करू शकत नाही. पैसे गेले, तेही कोणताही अलर्ट मिळण्याआधी.

फसवणूक टाळायची असेल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा बँकेने ग्राहकांना काही ठाम सूचना दिल्या आहेत. व्हॉट्सॲप, SMS किंवा ईमेलवरून आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक किंवा APK फाईलवर अजिबात क्लिक करू नका. कोणतंही बँकिंग ॲप केवळ Google Play Store किंवा Apple App Store वरूनच डाउनलोड करा. HDFC बँकेचे अधिकृत मेसेज हे नेहमी HDFCBK किंवा HDFCBN या आयडीवरून येतात आणि त्यातील लिंक hdfcbk.io पासून सुरू होते. याखेरीज आलेला कोणताही मेसेज संशयास्पद समजावा.

OTP, PIN मागणारा फोन म्हणजे थेट धोका

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, बँक कधीही फोन, मेसेज किंवा ईमेलवरून OTP, PIN, पासवर्ड विचारत नाही. कोणी तसे विचारले, तर तो थेट फसवणूक करणारा आहे, हे समजून घ्या. HDFC Bank News

फसवणूक झालीच तर काय कराल?

जर चुकून अशा फ्रॉडला बळी पडलात, तर एक मिनिटही वेळ न दवडता १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर कॉल करा किंवा National Cyber Crime Reporting Portal वर तक्रार नोंदवा. जितकी लवकर तक्रार, तितकी पैसे परत मिळण्याची शक्यता अधिक. आज मोबाईल आपल्या हातात असला, तरी सावधगिरी आपल्या मनात असणं तितकंच गरजेचं आहे. एक चुकीचा क्लिक तुमची वर्षानुवर्षांची बचत हिरावून घेऊ शकतो. त्यामुळे सतर्क रहा, शहाणपणाने निर्णय घ्या आणि कोणताही संशयास्पद मेसेज दिसताच तो ब्लॉक करून बँकेला कळवा.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!