लाडक्या बहिणींनो खुशखबर! ‘या’ दिवशी जमा होणार जानेवारीचा रखडलेला हप्ता; तुमच्या खात्यात 1500 रुपये येणार की 3000? वाचा नवीन अपडेट!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana January Installment Date | ​महाराष्ट्रातील लाखो माता-भगिनी ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहत होत्या, ती आनंदाची बातमी अखेर समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा जानेवारी महिन्याचा हप्ता आता लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. महापालिका निवडणुकांच्या धामधुमीत आणि आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेले हे पैसे आता तुमच्या हाती येण्यासाठी सरकारकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

निवडणुकांमुळे का रखडला होता हप्ता?

शहरांमध्ये महापालिका निवडणुका जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू होती. नियमानुसार, आचारसंहिता काळात सरकार कोणताही आर्थिक लाभ थेट जनतेला देऊ शकत नाही. त्यामुळेच सरकारने डिसेंबरचा हप्ता वेळेत दिला असला, तरी जानेवारीचा १५०० रुपयांचा हप्ता मात्र रखडला होता. खरं तर, सरकारने डिसेंबर आणि जानेवारी असे दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र देण्याचं नियोजन केलं होतं, पण आचारसंहितेने त्यात अडथळा आणला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय दिलं आश्वासन?

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना शब्द दिला होता की, आचारसंहिता संपताच रखडलेला हप्ता त्यांच्या खात्यात जमा केला जाईल. आता निवडणुकांचे टप्पे संपत आले असून, प्रशासकीय पातळीवर निधी वितरणाची फाईल पुन्हा एकदा वेग घेऊ लागली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा ‘१५००’ चा मेसेज झळकणार आहे.

पुढील २० दिवसांत पैसे मिळण्याची शक्यता!

येत्या ५ फेब्रुवारी रोजी राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांचे मतदान पार पडणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकांच्या रणसंग्रामापूर्वीच म्हणजेच पुढील १८ ते २० दिवसांत महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा निधी वर्ग केला जाऊ शकतो. जरी सरकारने अजून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केली नसली, तरी महिलांनी आपल्या बँक खात्यांवर आणि मोबाईलवरील मेसेजवर लक्ष ठेवलेलं बरं!

आर्थिक मदतीचा मोठा आधार

लाडकी बहीण योजना ही केवळ एक योजना नसून राज्यातील महिलांचा मोठा आर्थिक आधार बनली आहे. घरखर्च असो किंवा मुलांचे छोटे-मोठे शिक्षण, या १५०० रुपयांनी महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवला आहे. आचारसंहितेमुळे झालेला विलंब आता लवकरच भरून निघणार असून, सरकारचा हा निर्णय महिलांसाठी नक्कीच दिलासादायक ठरेल.

Leave a Comment

error: Content is protected !!